आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा चौथा गोलंदाज ठरला हरभजन


विशाखापट्टणम – आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या ‘क्वालिफायर-२’ सामन्यात एका नव्या विक्रमाला चेन्नईचा अनुभवी गोलंदाज हरभजन सिंहने गवसणी घातली आहे. हरभजनने या सामन्यात दिल्लीचे २ विकेट घेत आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे.

हरभजन सिंहने या सामन्यात दिल्लीचा सलामिवीर शिखर धवन आणि शेरफाने रुदरफोर्डला बाद करताच आयपीएलमध्ये १५० विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला. हरभजनने यासह सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. हरभजन हा आयपीएलमध्ये अशी अशी कामगीरी करणारा अमित मिश्रा आणि पियुष चावला यानंतरचा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

मुंबई इंडियन्सचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा १६९ विकेटसह सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत पहिल्या,अमित मिश्रा १५६ विकेटसह दुसऱ्या तर १५० विकेटसह हरभजन सिंह आणि पियुष चावला अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी आहेत.

Leave a Comment