ऑस्ट्रेलियाचा आता हा दिग्गज खेळाडू झाला जायबंदी


सिडनी – ३० मेपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला इंग्लंडमध्ये सुरुवात होत असून पण गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला या स्पर्धेपूर्वी दुखापतीचे ग्रहण लागले आहे. दुखापतीमुळे युवा वेगवान गोलंदाज जे. रिचर्डसन हा विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामागोमाग आता माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला देखील दुखापत झाली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात स्टीव्ह स्मिथला ही दुखापत झाली. ऑस्ट्रेलिया संघास त्याची ही दुखापत महागात पडू शकते. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजू शकले नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही सराव सामन्यात स्मिथने अनुक्रमे ८९ आणि नाबाद ९१ धावा केल्या आहेत. सध्या तो चांगल्या फॉर्मात आहे.

स्मिथने आयपीएलदरमन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात एक झेल टीपण्यासठी सूर मारला होता. ही दुखापत त्यावेळी त्याला झाली. स्मिथने यापूर्वी जानेवारीत त्याच्या हाताच्या कोपऱ्यावर शस्त्रक्रिया करून घेतली होती. स्मिथची ही दुखापत गंभीर असल्यास त्याला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर बसावे लागेल. परंतु ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगरने स्मिथच्या फिटनेसचे कौतुक केले आहे.

Leave a Comment