देशाला पहिल्यांदाच मागासवर्गीय पंतप्रधान मिळाला – रामदास आठवले


यवतमाळ : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत जरी नरेंद्र मोदी मागासवर्गीय नाहीत, असा सवाल मायावतींनी केला तरी त्या दलित नाहीत असे मी म्हणणार नाही, असे वक्तव्य केले. तेली समाजाचे नरेंद्र मोदी हे असून पहिल्यांदाच देशाला मागासवर्गीय पंतप्रधान मिळाला असल्यामुळे आठवले यांनी मायावतींच्या आरोपात तथ्य नसल्याचेही म्हटले.

जी जात मंडळ कमिशनमध्ये येते त्या जातीत नरेंद्र मोदी येतात. माझा हिंदू दहशतवाद, माओवाद, मुस्लिम दहशतवाद, नक्षलवाद या सगळ्या वादाला विरोध असून फक्त आंबेडकरवाद मी मानतो. माझा त्याला पाठिंबा आहे. आंबेडकरवाद म्हणजे शांती आहे. हिंसक वादाला माझा विरोध असून आंबेडकरवाद जातीपातीला जोडणारा असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

इंदिरा गांधींची 1984 च्या दंगलीत हत्या सुरक्षा रक्षकाने केल्यानंतर शीख बांधवांवर दिल्लीत अमानुष पद्धतीने हल्ले झाले. हजारो शीख बांधवांची हत्या करण्यात आली. ती घटना गंभीर होती. सॅम पित्रोदांच्या वक्तव्याशी सहमत नसून 1984 च्या दंगली कोणी विसरू शकत नसल्याचेही आठवले यांनी सांगितले.

Leave a Comment