नवीन अँड्रॉईड अपडेट या ’21’ स्मार्टफोनला मिळणार


मुंबई : दरवर्षी होणाऱ्या परिषदेत नवीन ऑपरेटिंग सिस्टम ‘Android Q’ च्या तिसऱ्या बीटाची गुगलने घोषणा केली. गुगलच्या ऑपरेटिंग सिस्टमचे Android Q नवे व्हर्जन आहे. जगभरात सध्या 2.5 अब्जाहून अधिक स्मार्टफोन अँड्रॉईंड सिस्टमवर चालतात. स्मार्टफोनमध्ये Android Q अपडेटेड नोटिफिकेशन पॅनल, नवीन फोकस मोड, लाईव्ह कॅप्शन, लोकेशन शेअरिंग, अनडू अॅप रिमूव्हल, बबल्स चॅट, वाय-फाय शेअरिंगसारखे अनेक फीचर आहेत.

आपल्या पिक्सल स्मार्टफोनशिवाय गुगल Android Q बीटा 3 ला इतर 15 स्मार्टफोनमध्येही ही नवीन सिस्टम आणणार आहे. यानुसार गुगलचे हे नवीन अँड्रॉईंड सिस्टम एकूण 21 फोनमध्ये असेल. या अँडॉईंड सिस्टममुळे फोनमध्ये अनेक नवीन अपडेटही येणार आहेत.

ओरिओ (oreo) आणि पाय (Pie) या दोन अँड्रॉईड सिस्टमवर भारतात स्मार्टफोन चालत आहेत. तसेच अनेक नव-नवीन अपडेटही यामध्ये आले आहेत. पण गुगलने आता अँड्रॉईड क्यू लाँच केल्याने नक्कीच यूजर्सला हा नवीन अपडेट आवडेल. हा तब्बल 21 नवीन फोनमध्ये नवीन अँड्रॉईड अपडेट मिळणार आहे. त्याफोनची यादी खालीप्रमाणे आहे.
Google Pixel 3 and 3XL
Google Pixel 2 and 2XL
Google Pixel and XL
Realme 3 pro
Oneplus 6T
Nokia 8.1
Asus zenFone 5Z
Huawei Mate 20 Pro
Tecno spark 3 pro
VIVO Nex s, Nex A and x27
Sony xperia xz3
oppo reno
xiaomi mi 9, Mi X 35G
LG G8 ThinQ
Esencial phone

Leave a Comment