‘एअरटेल’ने सादर केला नव्या बदलासह 129 रुपयांचा नवा प्लॅन


आपल्या पोस्टपेड प्लॅनमध्ये एअरटेलने मोठा बदल केला असून आता युजर्ससाठी एअरटेलने त्याचबरोबर नवा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना या पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळत असलेल्या सुविधा मिळणार आहेत. एअरटेलचा नवा प्लॅन हा प्रीपेड युजर्सला आकर्षिक करण्यासाठी सादर करण्यात आला आहे.

129 रुपयांचा नवा प्रीपेड प्लॅन एअरटेलने सादर केला आहे. माफक दरात सेवेचा लाभ युजर्सला मिळावा याचा विचार करुन एअरटेलने हा नवा प्लॅन सादर केला आहे. युजर्सला या प्लॅनअंतर्गत 2 जीबी डेटा 28 दिवसांसाठी दिला जाणार आहे. युजर्सला यात अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये या व्यक्तिरिक्त एअरटेल टीव्ही आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल. तुम्हाला एअरटेल टीव्ही वर 350 लाईव्ह टीव्ही चॅनल आणि 10 हजारहून अधिक चित्रपट आणि शोज पाहू शकता.

249 रुपयांचा प्लॅन तर सर्वात हटके आहे. 4 लाख रुपयांचा एचडीएफसी लाईफ इन्शोरन्स या प्लनअंतर्गत मिळेल. याशिवाय यात युजर्सला दररोज 2 जीबी डेटा सह अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. या प्लॅनची व्हॅलिटीडी 28 दिवसांची आहे. या प्लॅनअंतर्गत एअरटेल टीव्ही, विंक म्युझिकचे सब्सक्रिप्शन मिळेल. त्याचबरोबर नवा 4 जी फोन खरेदी केल्यास या प्लॅनअंतर्गत 2000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तसेच नॉरटोन मोबाईल सिक्युरिटीचे वर्षभराचे सब्सक्रिप्शन देखील मिळत आहे.

Leave a Comment