
एक स्पेसक्राफ्ट लाँच करण्याच्या तयारीत नासा असून 2022 मध्ये ‘स्पेस X – फाल्कन 9’ नावाचं हे रॉकेट सप्टेंबर ‘डिडिमॉस’ नावाच्या प्रणालीतल्या लघु चंद्राचा (Asteroid) चा आकाशातच वेध घेणार आहे. बायनरी अॅस्ट्रॉइड सिस्टिम – ‘मूनलेट’ म्हणजे आकाराने लाहन असलेला चंद्रासारखा Asteroid, जो एखाद्या मोठ्या लघुग्रहाभोवती फिरतो. तर बायनरी एस्ट्रॉइड सिस्टिम ही अशी एक सिस्टिम आहे, ज्यात अनेक लहान-मोठे लघु चंद्र केद्रस्थानी असलेल्या एका ग्रहाभोवती फिरत आहेत.

एखाद्या लघुग्रहाभोवती अंतराळात मोठ्या संख्येने फिरणारे लहान-मोठे खडक ज्यांना ‘मूनलेट’ असे म्हटले जाते आणि बायनरी अॅस्ट्रॉइड सिस्टिम असे या संपूर्ण प्रणालीला म्हटले जाते. ‘डिडिमोस’ नावाची अशीच एक प्रणाली अंतराळात असून, नासा सप्टेंबर 2022 मध्ये त्यातील एका मूनलेटचा म्हणजेच लघु चंद्राचा वेध घेणार आहे.

नासाचे डबल एस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट (DART) हे पहिले असे मिशन आहे, जे खगोलीय संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणार आहे. हे रॉकेट 2021 मध्ये DART आणि सोलर उर्जा शक्तीच्या माध्यमातून लाँच केले जाणार असून, ते सप्टेंबर 2022 मध्ये ‘डिडिमोस’ प्रणालीतील Asteroid चे तुकडे-तुकडे करेल असे नासाने म्हटले आहे.

जे Asteroid या अंतराळ मोहिमेत भेदले जाणार आहे, पृथ्वीपासून ते 1 कोटी 10 लाख कि.मी. अंतरावर असतानाच शास्त्रज्ञांना या खगोलीय घटनेला अंतिम रुप द्यावे लागणार आहे. तर पृथ्वीला त्यापासून कोणताच धोका नसल्याचे नासाने स्पष्ट केले आहे.

2015 पासूनच ‘डिडिमॉस’चा अभ्यास करायला नासाच्या शास्त्रज्ञांनी सुरुवात केली होती. उत्तर एरिझोना युनिव्हरसिटीच्या क्रिस्टिना थॉमस यांच्या नेतृत्वात सध्या सुरू असलेल्या एका मोहिमेच्या माध्यमातून टेलिस्कोपोद्वारे त्यावर लक्ष ठेवलं जात आहे. नासाची ही मोहिम फत्ते झाल्यानंतर म्हणजेच स्पेसक्राफ्ट Asteroid वर धडकल्यानंतरच्या स्थितीचा अभ्यास नासाचे शास्रज्ञ करणार आहेत. DART च्या या मोहिमेसाठी नासा 481 कोटी रुपये खर्च येणार आहे.
