स्वप्निल जोशीच्या ‘मोगरा फुलला’मधील नवे गाणे रिलीज


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला स्वप्निल जोशीचा ‘मोगरा फुलला’ चित्रपट येणार आहे. स्वप्निलची नवी भूमिका चाहत्यांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे मनमोहिनी, असे बोल आहेत.

स्वप्निल आणि सई देवधर यांचे निसर्गाच्या सानिध्यात खुलत जाणारे प्रेम गाण्यात पाहायला मिळत आहे. रोहित शाम राऊत यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. तर हे गाणे अभिषेक खानकर यांनी लिहिले आहे आणि रोहित शाम राऊत यांनीच गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे.

साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, संदीप पाठक, आनंद इंगळे, सुहिता थत्ते, समिधा गुरू, विघ्नेश जोशी, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड यांच्यादेखील चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. श्रावणी देवधर यांच्या या चित्रपटातून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता पडता लग्नाचे वय सरून गेलेल्या एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली आहे. हा चित्रपट १४ जूनला रिलीज होईल.

Leave a Comment