अक्षयचा ‘तो’ दावा नेटकऱ्यांनी काढला खोडून


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यापासून अभिनेता अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन पेटलेला वाद आज देखील ताजाच आहे. काही केल्या अक्षय आणि त्याच्या कॅनडाच्या नागरिकत्वाचा वाद शमण्याची चिन्ह दिसत नाही. अक्षयने काही दिवसांपूर्वी गेल्या ७ वर्षात मी कॅनडाला फिरकलो नसल्याचे वक्तव्य केले होते. पण एका ट्विटर युजरने अक्षयचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. त्याने त्यासोबतच दोन स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

मी कधीही कोणापासून माझ्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्याची गोष्ट लपविली नाही. त्याचबरोबर आपण गेल्या सात वर्षांत एकदाही कॅनडाला गेलो नसल्याचे ट्विट काही दिवसांपूर्वी अक्षयने केले होते. पण अक्षयचे हा दावा खोटा असल्याचा दावा एका नेटकऱ्याने केला आहे. अक्षयचा दावा खोटा असल्याचे काही पुरावेही या युजरने दिले आहेत.


काही ट्विटचे स्क्रीन शॉट्स या युजरने शेअर केले आहेत. या ट्विटपैकी एक ट्विट गायक मिका सिंग याचे असून ९ मार्च २०१४ रोजी त्याने एक ट्विट केले होते. गुड मॉर्निंग, अक्षय कुमार, राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, राहुल खन्ना. तुमच्यासोबत पार्टीत धम्माल आली, असे या ट्विटमध्ये म्हटले होते. तर दुसऱ्या एका स्क्रीनशॉटमध्ये अक्षय टीना वीरमानी हिच्या संगीत सोहळ्यामध्ये दिसत असून हा सोहळा टोरंटोमधील एका हॉटेलमध्ये होता. त्यामुळे अक्षयने केलेला दावा खोटा असल्याचे या युजरने म्हटले आहे.

Leave a Comment