कतरिनाला अरबाजने विचारले लग्नाचे प्लॅनिंग


चाहत्यांसाठी नेहमीच कतरिना आणि सलमानची जोडी खास आहे. या दोघांनीही विवाहबद्ध व्हावे, असा चाहत्यांचा अट्टाहास असतो. दोघांच्या रिलेशनशिप विषयीही अनेकदा अनेक बातम्या समोर येत असतात. अशात कतरिनाला तिच्या लग्नाच्या प्लॅनविषयी आता सलमानच्या भावाने म्हणजेच अरबाजनेच विचारले आहे.

नुकतीच अरबाज खानच्या ‘पिंच’ या चॅट शोमध्ये कतरिनाने हजेरी लावली होती. अरबाजने यावेळी तिला लग्नाविषयीचे प्लॅन विचारले. पण मोठ्या हुशारीने कतरिनानेदेखील या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. मी अद्याप लग्न कधी करायचे याबद्दल काही ठरवले नाही. आयुष्य अनिश्चित असल्यामुळे आयुष्याचा प्रत्येक दिवस मी जगून घेत आहे. त्यामुळे, या सगळ्याबद्दल काहीही कल्पना नसल्याचे तिने म्हटले आहे.

दरम्यान लवकरच ‘भारत’ चित्रपटातून कतरिना कैफ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती सलमानसोबत या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असून हा चित्रपट येत्या ५ जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची सलमान आणि कतरिनाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Leave a Comment