कुंबळेच्या आयपीएल ‘ड्रीम इलेव्हन’मध्ये नाही विराट आणि रोहितला स्थान


मुंबई – आता अंतिम टप्यात आयपीएलचा ‘महासंग्राम’ आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज गोलंदाज आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी त्या पार्श्वभूमीवर आयपीएलमधील आपला ११ खेळाडूंचा ‘ड्रीम इलेव्हन’ संघ निवडला आहे.

आपल्या ‘ड्रीम इलेव्हन’ संघात कुंबळें यांनी भारतीय वनडे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांना स्थान दिलेले नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये यंदा अंतिम फेरी गाठली आहे. असे असूनही कुंबळे यांनी आपल्या ड्रीम इलेव्हनमध्ये रोहितला स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अनिल कुंबळेची ड्रीम टीम – डेव्हिड वॉर्नर, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, आंद्रे रसल, हार्दिक पांड्या, इम्रान ताहीर, श्रेयस गोपाळ, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह

Leave a Comment