‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ची एक खास झलक अर्जूनने केली शेअर


लवकरच ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटातून अभिनेता अर्जून कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. प्रेक्षकांनी ज्याला उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर अर्जूनने आता चित्रपटातील आणखी एक झलक शेअर केली आहे.

बॉम्बस्फोट आणि निष्पाप जिवांचा जाणारा बळी याची झलक १५ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. भारतावर होणाऱ्या हल्ल्यात अनेक निष्पापांचे जाणारे जीव थांबवण्यासाठी ५ लोकांच्या टीमने उचलेले पाऊल आणि सर्वात क्रुर गुन्हेगार ओसामाला पकडण्यासाठी कोणत्याही हत्यारांविना चाललेली या टीमची धडपड, या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. राज कुमार गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत करण्यात आली आहे. हा चित्रपट २४ मे रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

Leave a Comment