तुम्ही पाहिला आहे का प्रभूदेवा, तमन्नाच्या ‘खामोशी’चा टीझर


लवकरच स्क्रीन शेअर करताना दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया दिसणार आहेत. ही जोडी आगामी ‘खामोशी’ चित्रपटात एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते.

आता चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. प्रभूदेवाचा क्रेझिनेस या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. तर तमन्ना घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. खामोशी हा एक हॉरर चित्रपट असणार आहे. अशात प्रेक्षकांची चित्रपटाच्या कथेबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा चित्रपट येत्या ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चक्री टॉलेटी यांनी केले आहे.

Leave a Comment