‘कबीर सिंग’चे नवे पोस्टर तुमच्या भेटीला


लवकरच ‘कबीर सिंग’ चित्रपटातून अभिनेता शाहिद कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट तेव्हापासूनच चांगलाच चर्चेत आहे. त्यातच आता चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

शाहिदसोबतच या पोस्टरमध्ये चित्रपटातील मुख्य अभिनेत्री कियारा अडवाणीचा लूकही पाहायला मिळत आहे. या पोस्टरसोबत चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. चित्रपटाचा ट्रेलर येत्या १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशात प्रेक्षक या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दाक्षिणात्य ‘अर्जून रेड्डी’ चित्रपटाचा ‘कबीर सिंग’ हा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटाचेही दिग्दर्शन ‘अर्जून रेड्डी’ चित्रपटाचे दिग्दर्शक संदिप रेड्डी वंगा करणार आहेत. चित्रपटात शाहिद एका यशस्वी मेडिकल सर्जनची भूमिका साकारत आहे. येत्या २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment