हा ड्रेस घालुन किम कार्दाशियनचे झाले वांदे


एकीकडे प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोणच्या लुकची मेट गालामध्ये चर्चा होती. त्यांच्याप्रमाणेच मेट गालामध्ये केटी पेरी आणि किम कार्दाशियनच्या नावाचीही काहीशी चर्चा होती.

सोशल मीडियावर किम कार्दाशियनचा लुक तुफान व्हायरल झाला. सोशल मीडियावर तिचा लुक हा नेहमीच आवडीने चर्चिला जाणारा विषय आहे. पण मेट गालामध्ये यावेळी तिने घातलेला ड्रेस थोडा वेगळा होता.

ड्रेसकडे पाहिल्यावर एक अंदाज नक्कीच येऊ शकतो की किमला हा ड्रेस घालायला किती त्रास झाला असेल. किमने न्यूड रंगाचा ड्रेस मेट गालामध्ये घातला होता.

तिने हा न्यूड ड्रेस हायलाइट करण्यासाठी त्यावर खास वॉटर बीड्स लावले होते. आपली परफेक्ट बॉडी दाखवण्यासाठी किमने असा टाइट फिटिंगचा ड्रेस घातला होता. हा ड्रेस घातल्यामुळे तिचे बसायचे देखील वांदे झाले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिक मादक अशी किमची कंबर दिसावी म्हणून तिच्या या ड्रेसला कमरेतून जास्त टाइट करण्यात आले होते. पण हा ड्रेस तिने जेव्हा घातला तिला तेव्हा चालणे फिरणे जमत होते पण बसणे शक्य नव्हते.

किमने याचा खुलासा मेट गालाच्या बिहाइंड द सीन व्हिडीओमध्ये केला. यावेळी ती म्हणाली की, सगळ्यांनी मला ऑल दी बेस्ट म्हणा. कारण पुढचे चार तास मी वॉशरूमला जाऊ शकत नाही. त्याचबरोबर किमचा मेट गाला अफ्टर पार्टीमध्येही लुक सर्वांपेक्षा हटके होता. चंदेरी रंगाच्या केसांचा विग आणि फिकट निळ्या रंगाचा मिनी ड्रेस तिने घातला होता.

Leave a Comment