
सोशल मीडियावर अभिनेता प्रियदर्शन जाधवला ट्रोल करण्यात आले. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत नाराजी व्यक्त करणारे ट्विट प्रियदर्शनने केले आहे. प्रियदर्शनने या ट्विटमध्ये, राजीव गांधी ह्यांच्या विधानाने तर पूर्णपणे तुम्ही पूर्णपणे मनातून उतरलात मोदीजी! सामान्य माणसाला काहीच कळत नाही, अशा भ्रमात राहू नका. ही तीच माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली आणि काँग्रेसला घरी बसवलं, असे ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे. या ट्विटनंतर त्याला चांगलाच ट्रोल करण्यात आले आहे.
मोदींबाबत नाराजी व्यक्त केली म्हणून प्रियदर्शन जाधव झाला ट्रोल
राजीव गांधी ह्यांच्या विधानाने तर पूर्णपणे मनातून उतरलात ! @narendramodi
सामान्य माणसाला काहीच कळत नाही, अशा भ्रमात राहू नका.ही तीच माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली आणि काँग्रेस ला घरी बसवलं….( बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही )— Priyadarshan Jadhav (@prizadhavv) May 5, 2019
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियदर्शन विविध विषयांवर नेहमीच भाष्य करत असल्यामुळे त्याला अनेक वेळा ट्रोल ही केले जाते. त्याने मस्का चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनातदेखील पदार्पण केले आहे. मोरुची मावशी, मिस्टर अँड मिसेस, जागो मोहन प्यारे यांसारख्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. प्रियदर्शनने विजय असो, चिंटू २ यांसारख्या चित्रपटांत काम केले आहे. पण टाईमपास २ या चित्रपटामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्याने साकारलेली दगडूची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. काही महिन्यांपूर्वी स्वप्निल जोशीसोबत तो मी पण सचिन चित्रपटात दिसला होता.
