अनेक क्रिकेटपटुंचे करिअर एकट्या आफ्रिदीने बर्बाद केले – इम्रान


लाहोर – पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीवर त्यांच्याच संघाचा फलंदाज इम्रान फरहतने गंभीर आरोप केले आहेत. आफ्रिदी एक स्वार्थी खेळाडू असून अनेक खेळाडूंचे करिअर ज्याने बर्बाद केल्याचे इम्रान म्हणाला आहे.

नुकतेच आपली आत्मकथा असलेल्या ‘गेम चेंजर’ मध्ये आफ्रिदीने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. काश्मीर आणि २०१० साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाबाबत ज्यात खुलासे करण्यात आले आहेत. त्याच सोबत जावेद मियाँदाद, वकार युनिस आणि गौतम गंभीरविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. पण आता आफ्रिदीवरच पाकिस्तानचा खेळाडू फरहतने आरोपाची तोफ डागली आहे.

फरहत म्हणाला की, आफ्रिदीच्या पुस्तकाविषयी मी जे काही ऐकले किंवा वाचले ते पाहून मला लाज वाटत आहेत. तो एक असा खेळाडू आहे, ज्याने त्याचे वय जवळजवळ २० वर्ष लपवून ठेवले आणि काही दिग्गज खेळाडूंना दोष देत आहे. पाकिस्तानकडून ४० कसोटी आणि ५८ एकदिवसीय सामने खेळणारा फरहत याने ट्विट करत लिहिले की, माझ्या जवळ या तथाकथित संताच्या अनेक कहाण्या आहेत. ज्याच्यासोबत मला खेळण्याचे भाग्य लाभले आहे. नेता बनण्याचे अनेक गुण त्याच्यात आहेत. या पुस्तकात ज्यांच्याविषयी लिहिले गेले आहे. त्यांनी पुढे येऊन त्याच्याविषयी बोलले पाहिजे. लोकांना आफ्रिदी खरे काय आहे, हे कळू द्या? ज्याने अनेक खेळाडूंचे करियर बरबाद केले आहे.

Leave a Comment