
अभिनेता सैफ अली खान याने ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाची घोषणा केली असून सैफच या चित्रपटाची निर्मितीही करत आहे. यात अभिनेत्री तब्बूसोबत सैफ तब्बल २० वर्षानंतर काम करीत आहे.
तब्बल 20 वर्षांनंतर स्क्रिन शेअर करणार तब्बू आणि सैफ अली खान
२० वर्षानंतर अभिनेत्री तब्बू आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एकत्रित काम करणार आहेत. ते दोघे आगामी ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघांनी ‘तू चोर मैं सिपाही’ आणि ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या आगामी चित्रपटाची निर्मितीदेखील सैफ अली इतर बॅनर्सच्या मदतीने करीत आहे.
‘जवानी जानेमन’ हा एक कॉमेडी चित्रपट असेल. या चित्रपटात तब्बूची महत्त्वपूर्ण भूमिका असेल. ती या चित्रपटात काम करीत असल्यामुळे सैफ आनंदित झाला आहे. ‘जवानी जानेमन’ चित्रपटाचे शूटींग पुढील महिन्यात सुरू होईल. याचे पहिले शेड्यूल लंडनमध्ये चित्रीत होणार आहे.
