मानुश्री छिल्लरसोबत बायोपिकमध्ये झळकणार अक्षय कुमार


आतापर्यंत अनेक हिंदी प्रोजेक्टसमधून ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकलेली मानुश्री छिल्लर प्रेक्षकांसमोर आली आहे, ती मोठ्या पडद्यावर कधी झळकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात मानुश्री झळकणार असून ती या चित्रपटात अक्षय कुमारसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे.

लवकरच बॉलिवूड चित्रपटांमध्ये जवळपास दोन वर्षांपूर्वी मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मानुश्री छिल्लर दिसेल अशी बरीच चर्चा होती. काही जणांच्या मते, ती फराह खानच्या एका चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार होती. तर काहींच्या मते ती रणवीर सिंगसोबतच्या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणार होती.

यासंदर्भातील वृत्त मनोरंजन विषयक संकेतस्थळ असलेल्या ‘पिंकव्हीला’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार लवकरच अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज चौहान यांच्या बायोपिकमध्ये मानुश्री दिसणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी हा ऐतिहासिक बायोपिक दिग्दर्शित करणार आहेत. हा चित्रपट मानुश्रीने साइन केला असून ती यात ‘संयुक्ता’ची भूमिका साकारणार आहे. मानुश्री दिसायला तर सुंदर आहेच पण ती एक उत्तम सादरकर्तीसुद्धा आहे. तिच्या ह्याच गुणांचा फायदा तिला या भूमिकेसाठी होईल. या भूमिकेसाठी मानुश्रीची निवड अगदी योग्य आहे असा विश्वास आदित्य चोप्राने व्यक्त केला आहे.