
बॉलीवूडची क्वीन कंगणा राणावत आणि हँडसम हंक ऋतिक रोशन यांच्यातला वाद आपल्याला काही नवीन नाही. त्यातच कंगनाचा मेंटल है क्या हा चित्रपट २१ जुलैला रिलीज होणार होता. पण याच दरम्यान ह्रतिक रोशनचा ‘सुपर ३०’ हा चित्रपट २६ जुलैला रिलीज होणार होता. पण ऋतिकवर वचपा काढण्यासाठी कंगणाने आपला चित्रपट २१ ऐवजी २६ जुलै रोजी रिलीज करण्याचा आग्रह धरला. निर्मात्याने आता तिच्या हट्टापायी ह्रतिकच्या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर घ्यायचे ठरवले आहे, अशी चर्चा सिनेजगतात सुरू आहे.
ह्रतिकच्या ‘सुपर ३०’सोबत कंगणा रिलीज करणार ‘मेंटल…’
पण या अफवा असल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे. ट्विटरवर याचा खुलासा करण्याचा एकता कपूर यांनी प्रयत्न केला. वितरकांनीच ही तारीख ठरवल्याचे तिने म्हटले आहे. हा निर्णय व्यावसायिक विचार करुनच झाल्याचे तिचे म्हणणे आहे. बालाजी मोशन पिक्चर्सचा ‘मेंटल है क्या’ हा सायकॉलॉजिकल थ्रिलर आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेलमुडी यांनी केले आहे. या चित्रपटात कंगणासोबत राजकुमार राव, अमेरा दस्तुर, ह्रर्शिता भट्ट, विक्रांत मेसी आणि जिमी शेरेगिल यांच्या भूमिका आहेत.
