आता घरपोच मिळणार व्होडाफोनचे सीम


सध्या टेलीकॉम क्षेत्रात जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे. व्होडाफोन कंपनीने बाजारातील या स्पर्धेला पाहता आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक खास सुविधा आणली आहे. प्रीप्रेड ग्राहकांना त्यांच्या घरपोच 4G सिम पोहचवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. फक्त नव्याने घेतलेल्या प्रीप्रेड ग्राहकांसाठी ही सुविधा असणार आहे. या सुविधेसाठी ग्राहकाला कंपनीच्या वेबसाईटवरुन 249 रुपयांचा एक रिचार्ज करावा लागेल. ग्राहकाला इतर कंपनीमधून व्होडाफोनमध्ये नंबर पोर्ट करायचा असेल, तरी देखील त्याला ही सुविधा मिळणार आहे.

28 दिवसांसाठी या प्लॅनची वैधता असेल. ग्राहकाला या प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. ग्राहकांना लोकल, एसटीडी आणि रोमिंग अनलिमिटेड कॉलिंग मोफत मिळणार आहे. सोबतच दररोज 100 मेसेज देखील या प्लॅनमध्ये मिळतील. जर आपण व्होडाफोनचे नवीन ग्राहक असाल आणि आपला नंबर जर व्होडाफोनमध्ये पोर्ट करणार असाल तर आपल्याला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तुम्हाला तिथेच नव्या नंबरसाठी आणि नंबर पोर्ट करण्याची रिक्वेस्ट टाकावी लागेल. 4G सिम कार्ड 4 दिवसानंतर आपल्या घरी पोहचवण्यात येईल. वेबसाईटवर लॉगिन केल्यानंतर ग्राहकाकडून वैयक्तिक माहिती मागितली जाईल.

व्होडाफोनने मागच्या काही दिवसांत 139 रुपयाचा नवीन प्लॅन बाजारात आणला होता. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स ऐवजी डेटा देखील देण्यात येत असल्यामुळे ग्राहकांना 5 जीबी 3G/4G डाटा मिळत आहे. 28 दिवसांची या प्लॅनची वैधता आहे. यासोबत अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंगची सुविधा देखील देण्यात आली आहे.

Leave a Comment