सात हजार बुलेटचे रॉयल एन्फिल्डकडून रिकॉल


मुंबई : तब्बल सात हजार बुलेट मोटार सायकल रॉयल एन्फिल्डने (Royal Enfield) परत मागवल्या आहेत. 20 मार्च 2019 ते 30 एप्रिल 2019 या दरम्यान या गाड्यांची विक्री झाली होती. कंपनीने या गाड्या परत या गाड्यांच्या ब्रेक कॅलिपर बोल्टमध्ये बिघाड आल्याने मागवल्या आहेत.

Bullet 500, Bullet 350 आणि Bullet 350 ES या मॉडलच्या गाड्या रॉयल एन्फिल्डने रिकॉल केल्या आहेत. या गाड्यांची सर्व्हिसिंग करुन खराब ब्रेक कॅलिपर बोल्टला कंपनी रिप्लेस करणार आहे. ब्रेकिंग सिस्टीमचे ब्रेक कॅलिपर्स महत्त्वाचे कम्पोनंट असतात. हे ब्रेक कॅलिपर आणि होजला सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल 2019 मध्ये रॉयल एन्फिल्डच्या विक्रीमध्ये एकूण 17 टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी रॉयल एन्फिल्डच्या 62,879 गाड्यांची विक्री झाली आहे.

Leave a Comment