खरोखरच पोटोशी आहे का दीपिका ?


आधी रणवीरसोबत लग्न केल्यामुळे बॉलीवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण चर्चेत होती त्यानंतर आता ती तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहेत. दीपिका पादुकोण गरोदर असल्याचे गेले अनेक दिवसांपासून बोलले जात होते. पण यावर उत्तर देत दीपिकाने अनेकदा आई होण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा विचार करेल, असे म्हटले आहे.

मेट गाला 2019 या कार्यक्रमात दीपिका पादुकोण सर्वांना दिसली. अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि गायक निक जोनसही यावेळी या कार्यक्रमात सर्वांना दिसला. या तिघांनी या कार्यक्रमानंतर एकत्र फोटो काढत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


दीपिका पादुकोण गरोदर असल्याच्या चर्चा प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोमुळे पुन्हा सुरु झाल्या आहेत. दीपिका पादुकोण फोटोमध्ये गरोदर असल्याचे दिसत असल्यामुळे हा फोटो अनेकांनी व्हायरल केला आहे. यावर दीपिका पादुकोणच्या एका जवळच्या व्यक्तीने दीपिकाच्या गरोदरपणाची अफवा हास्यास्पद आहे. हा फोटो चुकीच्या बाजूने घेतला असल्याचे म्हटले.

Leave a Comment