‘ही’ पॉप स्टार मातृत्वापासून वंचित


सध्या स्तन कॅन्सर या गंभीर आजाराशी प्रसिद्ध पॉप स्टार कायली मिनोगने झुंज देत आहे. कायली मिनोगकडून या आजाराने आई बनण्याचे सुख हिरावून घेतले आहे. आता कायली पुन्हा कधीही आई होऊ शकणार नसल्याने तिचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.

कायली मिनोगला 2005 मध्ये स्तन कॅन्सर झाला होता. तिच्या या आजारावर गेल्या अनेक वर्षापासून उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांनी त्यानंतर तिला तू कधीही आई बनू शकत नाही गोष्ट सांगितली. कायलीला यानंतर मानसिक धक्का बसला. सध्या कायली या धक्क्यातून स्वत:ला सावरत आहे.

कधीही आई होऊ शकणार नाही असा विचारही मी केला नव्हता. पण माझे सर्व आयुष्य स्तन कॅन्सरमुळे बदलून गेले. मी कधीही आई होऊ शकणार नाही याचे मला दु:ख आहे. एक स्त्री म्हणून आई होण्याचे सुख काय असते, याचा मी नक्कीच विचार करु शकते. आता माझे वय 50 वर्षे असल्यामुळे मी कधीही आई होऊ शकणार नाही याचा मी स्विकार केला आहे, असे कायली मिनोग म्हणाली.

Leave a Comment