
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराची पातळी लक्षात घेता मतदारांनी मानसिक संतुलन ढासळलेल्या व्यक्तीला पंतप्रधान पदावर बसवू नये, अशा शब्दांत वंचित बहुजन विकास आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.
मानसिक संतुलन ढासळलेल्या व्यक्तीला पंतप्रधानपदावर बसवू नका : प्रकाश आंबेडकर
पुण्यातील गंज पेठ येथे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकर यांनी या सभेला उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. पत्रकारांशी त्यानंतर संवाद साधताना राज्यातील अनेक घडामोडींवर त्यांनी भाष्य केले. आंबेडकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी निवडणुकीनंतर सत्तेत येणार नाही. तसेच पंतप्रधान देवेगौडांसारखी एखादी व्यक्ती होऊ शकते. या निवडणुकीत राज्याबाबत काय निकाल लागतील हे सट्टा बाजारालाही सांगता येईना तर मी काय सांगणार. या निवडणुकीत मान्यता प्राप्त पार्टी होऊ एवढ्या जागा वंचित बहुजन आघाडीला मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
