मोदींना मी पंतप्रधान मानत नाही; ममता बॅनर्जी


कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी झगराम येथे एका सभेला संबोधित करताना मोदींना मी पंतप्रधान मानत नाही. फनी चक्रीवादळामुळे झालेल्या हानीबद्दल मी आगामी पंतप्रधानांसोबत बोलेल, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता.

आता शेवटच्या टप्प्यात लोकसभा निवडणूक येऊन ठेपली असून राजकीय घडामोडींना त्यावरुन उधाण आले आहे. तर, विविध पक्षांचे दिग्गज एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींना ममता बॅनर्जी यांनी घेरले. चक्क मोदींना पतंप्रधान मानण्यापासूनच त्यांनी नकार दिला आहे.

फानी चक्रीवादळाने काही दिवसांपूर्वी देशामध्ये तांडव केला होता. पश्चिम बंगाललाही त्याचा झटका बसला आहे. पंतप्रधान मोदी यांचीही येथे सभा होती. दरम्यान केंद्राची पश्चिम बंगालला मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आपण ममता बॅनर्जी यांना फोन करून त्या बद्दल कळवले आहे, असेही त्यांनी म्हटले. मात्र, यानंतर ममता बॅनर्जी यांनी मोदींवर पलटवार केला.

मोदी निवडणुकांमध्ये फायदा लाटून घेण्यासाठी केंद्राची मदत देत आहेत. पण केंद्राच्या पैशाची आम्हाला गरज नसल्याचे स्पष्टीकरणच ममता बॅनर्जी यांनी दिले. आपल्या बळावरच झालेली हानी आम्ही भरून काढू, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी मारला.

Leave a Comment