सर्वोच्च न्यायालयाचा फॉक्सवॅगन ग्रुपला दिलासा


नवी दिल्ली – आघाडीच्या चारचाकी वाहन कंपनी फॉक्सवॅगनला राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरणाला हानी पोहचवल्या प्रकरणी ५०० कोटींचा दंड ठोठावला आहे. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी फॉक्सवॅगन ग्रुपच्या याचिकेवर सुनावणी झाली. हरित लवादाने न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत याविषयी कोणती कार्यवाही करू नये, असे न्यायालयाने सांगितले. फॉक्सवॅगन ग्रुपला न्यायालयाच्या या निर्णयाने काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘चीट डिव्हाईस’चा फॉक्सवॅगनने त्यांच्या डिझेल कारमध्ये वापर केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचत असल्याचा ठपका ठेवत ५०० कोटींचा दंड हरित लवादाने सुनावला होता. फॉक्सवॅगन ग्रुपकडून त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

Leave a Comment