प्रज्ञा ठाकूर यांच्याकडे राजकारण आणि गुन्हेगारी अशा दोन्ही बाजू


भोपाळ – भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ लोकसभेच्या उमेदवारी आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर सडेतोड मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री स्वरा भास्कर हिने जोरदार हल्ला चढवला. तसेच हिंदू दहशतवादाच्या त्या आरोपी असल्याचे स्वराने म्हटले आहे.

दहशतवादी कारवाई आणि हत्येची आरोपी असलेल्या प्रज्ञा ठाकूरला भाजपने उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांचा प्रचार कऱण्यासाठी आपण भोपाळमध्ये आल्याचे सांगताना स्वरा यावेळी म्हणाली की, हिंसा, गुन्हेगारी आणि दहशतवाद पाप आहे. कुणीही हे पाप करू शकते. हे पाप हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन यापैकी कुणीही करू शकते. असे पाप अनेकांनी केले आहे. पण दहशतवादाला धर्म नसतो. पण दहशतवाद्याचा धर्म असतो, अस स्वराने नमूद केले.

आपण प्रज्ञा ठाकूरला हिंदू दहशतवादी समजता का, असा प्रश्न स्वरा भास्करला विचारण्यात आला. स्वरा त्यावर म्हणाली होय, प्रज्ञा ठाकूर स्वत:ला हिंदू समजत असेल आणि ती हिंदू दहशतवादाची आरोपी आहे, तर मी तिला हिंदू दहशतवादाची आरोपी मानते. आपण देशाच्या संविधानाला आदर्श मानणाऱ्या विचारधारेसोबत आहोत. काँग्रेसचा जाहीरनामा मी वाचला आहे आणि माझ्या विचारांशी तो जुळतो. कौतुकास्पद असा काँग्रेसचा जाहिरनामा आहे. देशातील जनतेच्या मुळ प्रश्नांना यामध्ये हात घालण्यात आला आहे. यामध्ये अल्पसंख्याक, मागास आणि दलितांचा मुद्दा घेण्यात आला आहे. त्यात हिंसेला विरोध आहे. त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत असल्याचे स्वरा भास्करने सांगितले.

दरम्यान जे रुप घेऊन राजकारणात प्रज्ञा ठाकूर दाखल झाल्या आहेत, ते खरच धोकादायक आहे. प्रज्ञा ठाकूर यांच्याकडे राजकारण आणि गुन्हेगारी दोन्ही बाजू असल्यामुळे भोपाळमध्ये त्यांचा विरोध करण्यासाठी दाखल झाल्याचे स्वरा भास्करने सांगितले.

Leave a Comment