प्रियंकाचा हा अवतार पाहून बसला अनेकांना धक्का


अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनास 2017साली ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर पहिल्यांदा भेटले होते. त्यांची लव्हस्टोरी याच रेड कार्पेटवर सुरु झाली आणि पुढे दोघेही पती-पत्नी झाले. प्रियंका व निक दोघांसाठीही हा इव्हेंट खास आहे. प्रियंका व निक यंदा याच खास इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा जोडीने दिसले. दोघांनीही ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर स्टनिंग अवतारात एन्ट्री घेतली. पण यावेळी प्रियंकाचा अवतार पाहून अनेकांना धक्का बसला.

प्रियंकाने सॉफ्ट पेस्टल गाऊनमध्ये पिंक कार्पेटवर एन्ट्री घेतली. या थाई हाय स्लिट गाऊनवर पिंक आणि येलो फेदर लागलेले होते. प्रियंका या गाऊनमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. पण प्रियंकाने या गाऊनसोबत कॅरी केलेल्या हेअरस्टाईल आणि मेकअपने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रियंकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला ‘अफ्रिकन कर्ल’ स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. प्रियंकाचा हा लूक ‘मेट गाला’च्या यंदाच्या थीमनुसार एकदम परफेक्ट होता. पण देसी गर्लवर हा लूक अनेकांना रूचला नाही.

तिची हेअर स्टाईल, त्यावरचा क्राऊन हे सगळेच चर्चेचा विषय ठरले. प्रियंकाचा पिंक आणि शिमरी रंगाचा मेकअप आणि पांढऱ्या रंगाच्या आईब्रो लूक क्षणात व्हायरल झाला नसेल तर नवल. प्रियंकाचा हा लूक काहींना आवडला पण अनेक जण प्रियंकाचा हा अवतार पाहून थक्क झाले. मग काय प्रियंकाचा लूक पाहून अनेकांनी खिल्ली उडवणे सुरु केले. काहींनी तिला व्रिकम वेताळ म्हटले तर कुणी कार्टून. कुणी निक अगदी प्रियंकाचा ‘वेटर’ दिसतो आहे, असे लिहित त्यांची खिल्ली उडवली. काही युजर्सनी तर चक्क प्रियंकाचा हा लूक पाहून तिला ‘चेटकीण’ संबोधले.

Leave a Comment