रणबीरचे स्वतःचेच इन्स्टाग्राम अकाऊंट फेक


एकेकाळी अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे रिलेशनशीपमध्ये होते. एकमेकांना तब्बल ७ वर्षे डेट केल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यांच्यात ब्रेकअपनंतरही चांगली मैत्री आहे. त्यानंतर दोघांनीही आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केले. पण, अलिकडेच कतरिनाने रणबीरबाबत एका कार्यक्रमात एक खुलासा केला आहे.

बऱ्याचदा सोशल मीडियावर कतरिना सक्रिय असते. तर ती इन्स्टाग्रामवर नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पण तिने २०१२ साली पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू केले होते. तिला यामध्ये रणबीरनेच मदत केली होती. तिला इन्स्टाग्राम कसे वापरावे, हे त्यानेच शिकवले होते. पण रणबीरचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाऊंट बनावट असल्याचे तिने सांगितले.

तिने हा खुलासा अरबाज खानच्या ‘पिंच’ या कार्यक्रमात केला आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार अरबाजच्या या शोमध्ये हजेरी लावत असतात. या कार्यक्रमातच त्याने तिला तिचे अकाऊंट फेक आहे का, असा प्रश्न विचारला होता. तिने यावेळी रणबीरसोबत ब्रेकअपनंतरचा काळ कसा होता, याबद्दलही संवाद साधला.

कतरिना सध्या तिच्या ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर आलियासोबत ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये रणबीरही व्यस्त आहे. कतरिनासोबत ब्रेकअप नंतर आता आलिया आणि रणबीरच्या नात्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लवकरच ते लग्नगाठ बांधणार आहेत, असेही बोलले जात आहे.

Leave a Comment