श्रीया पिळगांवकरला लागली बॉलीवूडची लॉटरी


मराठमोळी अभिनेत्री श्रीया पिळगांवकर स्नेहा तौरानी यांच्या आगामी ‘भंगड़ा पा ले’ या चित्रपटात झळकणार आहे. ती यात विशेष कलाकार म्हणून काम करीत असली यात तिची महत्त्वाची भूमिका असेल. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९४० च्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका कथेवर हा चित्रपट आधारित आहे.

श्रीया याबद्दल बोलताना म्हणाली, स्नेहाच्या ‘भंगड़ा पा ले’ या चित्रपटाचा एक भाग बनल्यामुळे खूप उत्साही आहे. त्यांच्यासोबत काम करताना मजा येते. सनी कौशल आमि रुख्सार ढिल्लों यासारखे कलाकार ‘भंगड़ा पा ले’ या चित्रपटात आहेत. पुढे ती म्हणाली, सनीसोबत माझा खूप सुंदर रोल आहे. पंजाबमध्ये मी पहिल्यांदा शूट केले आहे आणि ते मला खूप चांगले वाटले. या चित्रपटात काम करणे खूप उत्साहजनक आहे.

श्रीयाने ‘मिर्जापुर’ मध्ये चांगले काम केल्यानंतर तिच्या हात खूप चांगले चित्रपट आहेत. यात गुरिंदर चड्ढा यांचा ‘बेचम हाऊस’, इरॉस इंटरनॅशनलचा ‘हाथी मेरे साथी’ आणि अनुभव सिन्हा यांच्या ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या चित्रपटांचा समावेश आहे.

Leave a Comment