डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये दीपिकाने केले सगळ्यांना घायाळ


जगभरातील सौंदर्यवतींनी न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘मेट गाला 2019’च्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याच्या जलवा दाखवला. यात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक चेहरा होता. दीपिका ‘मेट गाला 2019’च्या पिंक कार्पेटवर डिज्नी प्रिन्सेस लूकमध्ये उतरली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. दीपिका पिंक ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत होती. तूर्तास दीपिकाच्या ‘मेट गाला 2019’मधील लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यावेळी कस्टम मेड पिंक गाऊन दीपिकाने परिधान केलेला होता. डिझाईनर Zac Posen याने हा गाऊन डिझाईन केलेला होता. ‘मेट गाला 2019’ची यंदाची Camps: Notes on fashion ही थीम आहे. दीपिकाने या थीमला फॉलो करत 3 डी प्रिंटेड पीसला कम्बाइंड केले. दीपिकाच्या या लूकला शानदार हेयरडोसोबत कम्पलीट केले गेले.

Leave a Comment