भिंत आणि छत नसलेल्या ‘या’ हॉटेलमधील रुमसाठी द्यावे लागते एवढे भाडे


एखादे आलिशान हॉटेल म्हटले तर आपल्या डोळ्यांसमोर एक सुंदर इमारत त्यात स्वीमिंग पूल, सुंदर गार्डन असे चित्र उभे राहते. पण अशीही एक हॉटेल रूम जगात आहे जी खुल्या आकाशाखाली आहे. एकप्रकारे हे एक ओपन एअर हॉटेल रूम आहे. ही रूम स्वित्झर्लॅंड हिरव्यागार सुंदर डोंगरांच्या मधोमध आहे.

the null stern hotel असे या हॉटेलचे नाव आहे. या हॉटेलची खासियत ही आहे की, या रुमवर ना छत आहे ना या रूमला भिंत देखील आहे. एक क्वीनसाइज सुंदर बेड येथे केवळ लावला आहे. पांढऱ्या रंगाची चादर ज्यावर अंथरलेली आहे. तसेच या बेडच्या आजूबाजूला लॅम्प सेट लावले आहेत.

एका बेडशिवाय येथे दुसरे काहीही नाही. भलेही हे ऐकायला जरा अजब वाटत असेल. पण हे फोटो पाहिल्यावर कुणाचीही एकदा येथे जाण्याची इच्छा नक्कीच होईल. समुद्र सपाटीपासून ६ हजार ४६३ फूट उंचीवर हे ठिकाण आहे. येथे एक रात्र घालवण्यासाठी १५ हजार रूपये द्यावे लागतात.

या हॉटेलच्या नावाचा जर्मनीत अर्थ झीरो स्टार्स असा आहे. जगभरातील हॉटेल्सची क्वालिटी ही सामान्यपणे त्यांच्या स्टार्सवरून पाहिली जाते. जसे की, ५ स्टार, ७ स्टार. पण या हॉटेलच्या नावाचा अर्थ झीरो स्टार आहे. २०१६ मध्ये हे हॉटेल लॉन्च झाले होते आणि बुकिंग २०१७ मध्ये सुरू झाली होती. आता येथे येणाऱ्यांची संख्या फारच वाढली असल्यामुळे हॉटेलचे मालक असे आणखी रूम्स करण्याचा विचार करत आहेत. हॉटेलचे को-फाउंडर यांचे मत आहे की, येथे येणारे गेस्टच त्यांचे स्टार्स आहेत.

Leave a Comment