अभिनेत्री गौहर खान राहुल गांधींच्या समर्थनार्थ मैदानात


राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यामुळे अभिनेत्री गौहर खान चर्चेत आली आहे. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन बरेच वाद तयार झाले. या वादात ट्विट करुन बिग बॉस विजेत्या गौहरने आपली भूमिका मांडली आहे.

गौहरने ट्विटमध्ये लिहिले आहे कि, माझ्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे. तुमचे वडील दिवंगत राजीव गांधी हे सन्माननिय पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्याबद्दल आकस असू शकतो. तुमचा सन्मान तुम्ही कायम राखला आहे. अजून तुम्ही मजबूत व्हा राहुल गांधी. असे म्हणत गौहरने केलेल्या ट्विटचे अनेक जण कौतुक करीत आहेत तर काहींनी तिला ट्रोल करायलादेखील सुरूवात केली आहे.

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये झडत आहेत. राजीव गांधी आणि काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधानांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. मोदी म्हणाले होते, राजदरबाऱ्यांनी तुमच्या वडिलांना मिस्टर क्लिन ठरवले होते. पण त्यांचा अंत भ्रष्टाचारी नंबर १ म्हणून झाला. जो अहंकार तुम्ही बाळगला आहे त्याचाही अंत होईल. हा देश चुका करणाऱ्यांना माफ करेल मात्र विश्वासघात करणाऱ्यांना नाही.

राहुल गांधींनी मोदी यांच्या वक्तव्यानंतर ट्विट करीत जबरदस्त जवाब दिला होता. राहुल गांधींनी लिहिले, मोदीजी तुमची लढाई संपली. तुमच कर्म तुमची वाट पाहात आहे. स्वतःचे विचार माझ्या वडीलांवर लादणं तुम्हाला वाचवू शकणार नाही. राहुल गांधींनी असे सडेतोड आणि संयमी उत्तर दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक जण बोलू लागले आहे. बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय. काही दिवसापूर्वी फराह खानने ट्विट करुन राहुल गांधीचे समर्थन केले होते.

Leave a Comment