त्या दृश्यानंतर प्रिया बापटला सर्वाधिक गुगल सर्च


नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ अभिनेत्री प्रिया बापटची ही पहिलीवहिली वेब सीरिज आली आहे. ‘हॉटस्टार’वरील या वेबसीरिजमधील प्रियाचा बोल्ड सीन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियाचा अभिनेत्री गीतिका त्यागीसोबतचा बोल्ड सीन असून तिला याबद्दल ट्रोलही केले जात आहे. पण तिला गुगलवर तेवढेच सर्चसुद्धा केले जात आहे. विशेष म्हणजे त्या एका दृश्यामुळे दक्षिण भारतातील प्रिया बापटचा गुगल सर्च वाढला आहे.

प्रियाला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सीरिजपेक्षाही जास्त सर्च केले जात आहे. ‘गुगल ट्रेण्ड’नुसार प्रिया बापटचा सर्च ३ मेपासून वाढला आहे. ही वेब सीरिज याच दिवशी प्रदर्शित झाली होती आणि सोशल मीडियावर त्यातील बोल्ड सीन व्हायरल झाला. प्रिया बापटला तेव्हापासूनच गोवा, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षाही अधिक सर्च केले गेल्यामुळे प्रिया दक्षिण भारतात विशेष चर्चेत आली आहे.

Leave a Comment