पाकिस्तानी तरुणींशी विवाह करण्यास चिनी तरुणांची सर्वाधिक पसंती


बीजिंग- एकच अपत्याला कोणतेही दाम्पत्य जन्म देऊ शकतो, असा चीनमध्ये नियम आहे. पण तेथील मुलींच्या संख्येत या नियमामुळे कमालीची घट झाली असल्यामुळे आता परदेशी मुलींशी चिनी तरुण लग्न करू लागले आहेत. चिनी तरुण हे यात पाकिस्तानी तरुणींशी विवाह करण्यास सर्वाधिक पसंती दर्शवत आहेत.

सध्याच्या घडीला चीनमध्ये लैंगिक असमानतेच्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे. याचमुळे लग्न करण्यासाठी चीनमध्ये फार कमी मुली आहेत. तसेच चिनी तरुणाकडे जर स्वतःचा फ्लॅट नसेल तर मुलीचे पालक मुलीचा हात त्या चिनी तरुणाच्या हातात देत नाहीत. चीनच्या मोठ्या शहरांमध्ये महागडे फ्लॅट असल्यामुळे ते विकत घेणे हे चीनमधील तरुणांसाठी अवघड काम असल्यामुळे आता चिनी तरुण परदेशात जाऊन विवाह करतात. ते त्यांना त्यानंतर चीनला घेऊन येतात. अशी लग्न तुटतातही.

चिनी तरुण पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात येतात. कारण तिथे जाऊन ख्रिश्चन मुलीशी लग्न करणे त्यांच्यासाठी सोपे असते. अशा प्रकारचे लग्न लावून देणारे एजंटही पाकिस्तानात आहेत. पाकिस्तानमध्ये येऊन चिनी तरुण लवकरात लवकर लग्न करू इच्छितात. पाकिस्तानमध्ये लग्न लावून देणार एजंट गरीब ख्रिश्चन तरुणींशी चिनी तरुणांचे लग्न लावून देतात. त्यांना लग्नासाठी 50 ते 60 हजारपर्यंत रक्कम दिली जाते. त्यानंतर अशा पादरीचा शोध घेतला जातो. जे चर्चमध्ये लग्न लावून देतील. त्याच्या मोबदल्यात पादरीलाही 50 हजारांपासून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळतात. सर्व खर्च मिळून अडीच लाखांमध्ये चिनी तरुण पाकिस्तानी तरुणींशी लग्न करतात.

चीनमध्ये लग्न करणे महागडे असून मुलीच्या कुटुंबीयांनाही तिथे महागडी गिफ्ट द्यावी लागतात. तसेच चांगली नोकरी आणि फ्लॅट ज्या मुलाकडे आहे, चिनी पालक त्या मुलाशीच मुलींची लग्न लावून देतात. चिनी तरुण पाकिस्तानमध्ये लग्न केल्यानंतर पुन्हा मायभूमीत परततात. सहा महिने ते वर्षभरात काहींच्या नातेसंबंधात कटुता येते. तर काही जण पत्नीबरोबर कॉरिडोरशी संबंधित प्रकल्पासाठी पाकिस्तानमध्येच राहणे पसंत करतात. पत्नीबरोबर ते पाकिस्तानी तिकडेच राहतात. पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये एक पूर्ण चिनी शहर वसवले जात आहे.

Leave a Comment