जगातील टॉप १० लोकप्रिय संघात मुंबई इंडियन्सचा समावेश


नवी दिल्ली – फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांचे जगभरात अनेक चाहते आहे. पण चाहत्यांच्या ऑनलाईन संख्येत फुटबॉलच्या नामांकित संघांना भारतातील इंडियन प्रिमिअर लीगची (आयपीएल) फ्रँचाईज असलेल्या मुंबई इंडियन्स ही टक्कर देऊ लागली आहे. जगभरातील सर्वात अधिक १० लोकप्रिय संघापैकी मुंबई इंडियन्स एक संघ असल्याचे मार्च २०१९ मधील पाहणीदरम्यान दिसून आले आहे. इन्स्टाग्रामवर यावेळी मुंबई इंडियन्सला ३ कोटी ४३ लाख व्ह्युज मिळाले आहेत.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे जगातील टॉप १० मध्ये झळकलेले जगातील केवळ दोनच क्रिकेट संघ आहेत. तर आशियातील एकमेव क्रीडा संघ ठरले आहेत. बहुतेक फुटबॉल संघाचे या यादीमध्ये वर्चस्व आहे. या यादीत बार्सेलोना ही १०.८ कोटी व्ह्युज मिळवून सर्वप्रथम आहे. त्यानंतर लिव्हरपूल ९.३३ कोटी व्ह्युज मिळवून दुसऱ्या तर, जुवेन्टस ६.५६ कोटीने तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबई इंडियन्स हा आशिया संघामध्ये यु ट्युब पेजवर एप्रिलमध्ये सर्वात अधिक व्ह्युज मिळविणारा क्रीडा संघ ठरला होता. मुंबई इंडियन्सने यु ट्युब पेजवर १.६१ कोटी व्ह्युज मिळविले होते. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (७२ लाख ६० हजार ) आणि चेन्नई सुपर किंग्ज (६७.३ लाख) यांनी आशियातील यादीत पहिल्या तीनमध्ये क्रमांक पटकाविला होता. यु ट्युब व्हिडिओ कंटेनमध्ये मुंबई इंडियन्सचा जगात तिसरा क्रमांक आहे. तर एफसी बार्सेलोना ३.५९ कोटी व्ह्युज मिळून पहिल्या क्रमांकावर आहे. डिपॉर्टस आणि फायनाझास या स्पॅनिश क्रीडा व्यवस्थापन कंपनीने हा सर्व्हे केला. यामध्ये सर्व खेळांचा सोशल मीडियातील प्रभाव दाखविण्यात आलेला आहे. मुंबई इंडियन्सला अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी प्रायोजकत्व देण्यात आजवर स्वारस्य दाखविलेले आहे.

Leave a Comment