येणार ‘गदर-एक प्रेम कथा’ चा सिक्वेल


अभिनेता सनी देओल, अभिनेत्री अमिषा पटेल आणि ज्येष्ठ दिवंगत अभिनेते अमरिश पूरी अशी स्टारकास्ट असणारा गदर-एक प्रेम कहाणी’ चित्रपट त्याकाळी तुफान हिट झाला होता. या चित्रपटाचा आता सिक्वेल येणार असल्याची माहिती चित्रपटाच्या टीममधील एका सूत्राने दिली आहे.

याबाबत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गदरच्या सिक्वेलसाठी गेली १५ वर्ष आमची टीम काम करत आहे. तारा(सनी दिओल), सकीना(अमिषा पटेल) आणि त्यांचा मुलगा जीत या तीन मुख्य पात्रांभोवतीच या सिक्वेलची कथा फिरणार आहे. त्याचबरोबर कथेचे भारत – पाकिस्तान हे सूत्र असेल. तेच कलाकार या सिक्वेलमध्ये भूमिका साकारताना दिसतील. सध्या सनीशी आम्ही याविषयी बोलत आहोत. त्यामुळे, यापेक्षा अधिक कोणतीच माहिती याक्षणी आम्ही देऊ शकत नाही. तब्बल १८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रदर्शित झालेल्या ‘गदर-एक प्रेम कथा’ ने त्यावेळी २५६ कोटींचा गल्ला कमावला होता. त्यामुळे आता चित्रपटाचा सिक्वेल कसा असेल आणि बॉक्स ऑफिसवर काय जादू करेल हे पाहावे लागेल.

Leave a Comment