तुम्ही पाहिली आहे का टायगर-अनन्याची रोमॅन्टिक केमेस्ट्री?


लवकरच तुमच्या भेटीला टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारीया अभिनित ‘स्टूडंट ऑफ द ईयर-2’ येण्यासाठी सज्ज झाला आहे. यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला या चित्रपटाचा ट्रेलर आणि 3 गाणी आली आहेत. या चित्रपटातील ‘फकीरा’ हे नविन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे यांची रोमॅन्टिक बॉन्डिंग या गाण्यात पाहायला मिळते.

‘फकीरा’ गाण्याचा व्हिडिओ करण जोहरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. आत्तापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त व्ह्युज या गाण्याला मिळाले आहेत. अवनिता दत्ता यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर, हे गाणे सनम पुरी आणि नीति मोहन यांनी गायले आहे. हे गाणे विशाल-शेखर या जोडीने संगीतबद्ध केले आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टायगर श्रॉफनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटातील सर्व गाण्याच्या स्टेप्स त्याने केल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ देखील चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. पुनित मल्होत्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत निर्मिती केली जात आहे.

Leave a Comment