राहुल गांधींना ‘पप्पू’ म्हणाऱ्यांनी दहा वेळा विचार करावा – सॅम पित्रोदा


भोपाळ – ओव्हरसीस काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ‘पप्पू’ नसून ते हुशार आणि उच्च शिक्षित असल्याचा दावा केला आहे. त्यांनी हे वक्तव्य मध्य प्रदेशात एका पत्रकार परिषदेत बोलताना केले. हुशार आणि तरुण पतंप्रधानाची देशाला गरज आहे आणि त्यासाठी राहुल गांधी परिपूर्ण असल्याचेही पित्रोदा यावेळी म्हणाले.

समाज माध्यमांवर राहुल गांधी यांना पप्पू म्हणून ओळखले जाते. त्यांची यावरून मोठ्या प्रमाणात खिल्ली देखील उडवली जाते. अद्यापही राजकारणाचा ‘र’ त्यांना समजत नाही, असे अनेक दावे केले जातात. काँग्रेसला त्यावर उत्तर देण्यासाठी विशेष पत्रकार परिषदच घ्यावी लागली.

राहुल गांधी अत्यंत चाणाक्ष बुद्धीचे व्यक्ती आहेत. आपण मोठा काळ त्यांच्या सहवासात घालवला आहे. अनेकदा देशाच्या भविष्याबाबत त्यांनी माझ्याशी संवाद साधला आहे. त्यांची देशासाठी असलेली तळमळ आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांच्या योजनांनी मला अनेकदा आकर्षित केले आहे, असे सॅम पित्रोदा यांनी पत्रकारांना सांगितले.

तरुण नेतृत्वाची भारताला गरज आहे. असा व्यक्ती देशाला हवा आहे, तंत्रज्ञानावर जो काम करतो पण जुमलेबाजी करत नाही. अशा नेतृत्वाची आपल्याला गरज आहे, ंलोकशाहीवर आपल्याला विश्वास आणि जो लांकाबद्दल बोलतो. मला आशा आहे, राहुल गांधी देशामध्ये नक्कीच बदल घडवून आणतील. कारण मागील 5 वर्षांत भाजपने त्यांच्या विरोधात जे पेरले आहे, त्यापेक्षा राहुल गांधी अत्यंत भिन्न असल्याचेही पित्रोदा म्हणाले.

Leave a Comment