ज्येष्ठ नेते शकील अहमद यांची काँग्रेसमधून हकालपट्टी


पाटणा – काँग्रेस पक्षाने काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते शकील अहमद यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याचबरोबर बेनपट्टीचे आमदार भावना झा यांचीही पक्षविरोधी कारवाईमुळे काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. बंडखोरी करून मधुबनी मतदारसंघातून शकील अहमद हे अपक्ष निवडणूक लढवत असल्यामुळे एक पत्रक काढून पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेऊन पक्षाने हे पाऊल उचलले आहे.

राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारणीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात असे सांगण्यात आले आहे की, बिहारच्या मधुबनी लोकसभा मतदारसंघातून शकील अहमद यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच निवडणुकींदरम्यान पक्षविरोधी कारवाया बेनीपट्टीचे आमदार भावना झा यांनी केल्याने हाकलण्यात आले आहे. शकील अहमद यांना झा यांनी पाठिंबा दिला होता. मधुबनीतून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले शकील अहमद यांना बिहार स्टेट यूनिट ऑफ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) यांनी पांठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या जागेवरून ते काँग्रेसचे खासदार राहिले आहेत.

Leave a Comment