…तर तृणमूलच्या कार्यकर्त्यांना कुत्र्यासारखे बदडून काढेल – भाजप उमेदवार


कोलकाता – घाटल लोकसभा मतदार संघातील भाजपच्या महिला उमेदवार आणि माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कोणत्याही मतदारास त्रास दिला तर घरातून काढून कुत्र्यासारखे बदडून काढेल, अशी धमकी दिली आहे. पश्चिम बंगालच्या आनंदपूर येथील रुग्णालयात भरती असलेल्या भाजप कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर रुग्णालयाबाहेर निघताच त्यांनी ही धमकी दिली आहे.

सहाव्या टप्प्यात घाटल लोकसभा मतदार संघामध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. दरम्यान विविध पक्ष तेथे संपूर्ण ताकद लावून प्रचार करत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला मत न देण्याचा इशारा परिसरात दिला होता. दरम्यान काही भाजप कार्यकर्त्यांना त्यांनी मारहाणही केल्याचा आरोप आहे. त्यानंतर चिढलेल्या भारती घोष यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना धमकावले.

भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांनो लक्षात ठेवा. मी तुम्हाला घराबाहेरून काढेल आणि सतत १ वर्ष कुत्र्यासारखे बदडेल. त्यासाठी गरज भासल्यास उत्तर प्रदेशातून हजारो भाजपचे कार्यकर्ते बोलावून घेईल. त्यानंतर तुम्ही काहीच करू शकणार नाहीत. तर, तुम्ही घरीही परतू शकणार नाही. घरी जा आणि तुमचे दार आतून लावून घ्या, अशी धमकी त्यांनी यावेळी दिली.

या घटनेनंतर तृणमूलचे सचिव पार्थ चॅटर्जी यांनी उत्तरही दिले आहे. निवडणूक आयोगाचे भाजपच्या अशा नेत्यांवर लक्ष आहे का? लोकांना मारण्याच्या धमक्या भारती घोष देत आहेत. त्या एक आयपीएस अधिकारी आहेत. आपण त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करणार आणि आयोगा समोर मांडणार असल्याचे चॅटर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment