अक्षय्य तृतीयेसाठी पेटीएमची सुवर्ण ऑफर


साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेला लोकांचे सोने खरेदीला प्राधान्य असते. त्यातच ई-वॉलेटमधील अग्रगण्य कंपनीने असलेल्या ‘पेटीएम’ने हीच वेळ साधत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर सुरु केली आहे. पेटीएम गोल्ड सर्व्हिस पेटीएमने सुरू केली आहे. तुम्हाला या ऑफर अंतर्गत अवघ्या 1 रुपयात 24 कॅरेट सोने खरेदी करता येणे शक्य आहे.

1 रुपया ते 1.50 लाख रुपयापर्यंत सोने पेटीएमवर खरेदी करु शकता. पेटीएमवर सोने खरेदी करण्यासाठी पैशांमध्ये आणि ग्राममध्ये असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी पैशांमध्ये खरेदी करण्याचा पर्याय निवडून तुम्ही त्याठिकाणी किमान एक रुपयात (0.0003 ग्राम) सोने खरेदी करु शकतात. तुम्ही खरेदी करत असलेले सोने 24 कॅरेटचे असून लॉकरमध्ये ते ठेवले जाईल आणि तुम्ही ते हवे तेव्हा घरी घेऊन जावू शकता, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. सोन्याची खरेदी केल्यानंतर तुमचे सोने MATC–PMP या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले जाईल. खरेदी केलेले सोने त्याचठिकाणी तुम्ही लगेच विकू देखील शकता. किमान 1 ग्रॅम सोने खरेदी केल्यास घरी ते सुरक्षित पोहोचवले जाईल. यामध्ये 1, 2, 5, 10 आणि 20 ग्रॅम सोन्याची नाणी आहेत. याशिवाय तुम्हाला कॅशबॅक आणि डिजीटल सोने खरेदी करण्याचा पर्याय देखील दिला जातो.

Leave a Comment