दीपिकाने हिसकावला कंगनाचा चित्रपट?


अनेक दिग्दर्शक वेगवेगळ्या कलाकारांशी बऱ्याचदा एखाद्या चित्रपटासाठी चर्चा करत असतात. पण दुसऱ्या कामात बरेचसे कलाकार हे आधीच व्यस्त असल्यामुळे काही चित्रपट करू शकत नाही आणि त्या चित्रपटात त्यांच्या जागी दुसऱ्या कलाकाराची वर्णी लागते. आता दीपिका पादूकोण अनुराग बासूचा ‘इमली’ हा चित्रपट करणार अशी चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये सुरू आहे. या चित्रपटात यापूर्वी कंगना राणावत काम करणार होती. पण तिने या चित्रपटात करण्यास नकार दिला आहे.

चित्रपट कंगनाने सोडल्यानंतर दीपिका पादुकोणच्या नावाची या चित्रपटासाठी चर्चा सुरू आहे. याबाबत दिग्दर्शकाने तिच्याशी संपर्क साधला आहे. या चित्रपटाती कथा दीपिकालाही आवडली आहे. पण तिने याबाबत अद्याप काहीही उत्तर दिलेले नाही. आपल्या स्वत:च्या चित्रपटाची घोषणा लवकरच कंगना करणार आहे. स्वत: कंगना हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. असल्यामुळेच ‘इमली’ करायला कंगनाने नकार दिला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी दीपिकाशी संपर्क साधला. आता दीपिका हा चित्रपट साईन करते की नकार देते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दीपिका सध्या ‘छपाक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती यात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिची भूमिका साकारताना दिसेल. या चित्रपटाचे पोस्टर आणि बरेचसे सीन सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

Leave a Comment