अक्षयच्या मदतीसाठी पुढे सरसावले अनुपम खेर


सध्या सोशल मीडियामध्ये अक्षय कुमारच्या नागरिकत्वावरुन सुरु असलेल्या चर्चेला फार उधाण आले आहे. नेटकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षय कुमार भारतीय नसून कॅनडाचा नागरिका असल्यामुळे त्याला राष्ट्रीय पुरस्कार कसा देण्यात आले, असे प्रश्न विचारले जात आहेत. अक्षयने या सर्व चर्चांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करून नेटकऱ्यांना स्पष्ट उत्तरही दिले होते. तरीही सोशल मीडियामध्ये त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्दयावरून वादंग सुरूच असल्यामुळे त्यामुळे अक्षयच्या मदतीसाठी बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अनुपम खेर हे पुढे सरसावले आहेत. त्यांनी ट्विटरद्वारे अक्षयला पाठिंबा दिला आहे.


ट्विटरवर अनुपम खेर यांनी ट्विट केले आहे, की मी बऱ्याच दिवसांपासून तुझ्या नागरिकत्वाच्या मुद्दयावरून पेटलेले वाद वाचत आहे. देशावर तुझे प्रेम आहे, हे सिद्ध करण्याची तुला गरजच नाही. तू खरा योद्धा आहेस. कोणालाही काहीही समजावून सांगण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षयने एक भावनिक पोस्ट लिहिली होती. ज्या चर्चा त्याच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून सुरू आहेत, त्याचे उत्तर त्याने या पोस्टच्या माध्यमातून दिले होते. त्याने काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीनंतरच त्याच्या नागरिकत्वाचा मुद्दा उचलला गेला आहे.

Leave a Comment