रोमॅन्टिक हिरोची ओळख पुसण्याच्या तयारीत आदित्य रॉय कपूर


आदित्य रॉय कपूर याची बी-टाऊनमध्ये रोमॅन्टिक हिरो अशी ओळख असून तो लवकरच आपली ही ओळख पुसून एका अॅक्शनपटात झळकणार आहे. तो मोहित सूरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘मलंग’ चित्रपटात अॅक्शन हिरो म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो यासाठी तब्बल १० किलो वजन वाढवणार आहे.

लव्ह फिल्म्स आणि टी-सीरिजची निर्मिती असलेला ‘मलंग’ चित्रपट एक रोमॅन्टिक हॉरर चित्रपट असून आदित्य रॉय कपूरसोबत या चित्रपटात दिशा पटाणी, अनिल कपूर आणि कुणाल खेमू हे कलाकारही झळकणार आहेत. आदित्यने या चित्रपटाबाबत सांगितले, की मलंग एक डार्क थ्रिलर प्रेमकथा असून मी यासाठी फार उत्साही आहे. पहिल्यांदाच अॅक्शन हिरोची भूमिका साकरत असल्यामुळे नव्या भूमिकेत मला पाहता येईल.

चित्रपटाच्या अॅक्शनसाठी आदित्यने तयारी देखील सुरू केली आहे. तो वजन वाढवण्यासाठी जिममध्ये मेहनत घेत आहे. आहारावरही तो लक्ष देत आहे. त्याचे या चित्रपटात दोन वेगवेगळे लूक्स पाहायला मिळणार आहेत. अलिकडेच ‘कलंक’ चित्रपटात आदित्य दिसला. चाहत्यांना ‘कलंक’ चित्रपटाकडून फार अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल आपटला आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, वरूण धवन, आलिया भट्ट आणि माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट झळकली होती. पण प्रेक्षकांची या चित्रपटाने निराशा केली. तो ‘मलंग’ चित्रपटानंतर आलिया भट्ट सोबत ‘सडक-२’मध्ये देखील भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात संजय दत्त मुख्य भूमिकेत असेल.

Leave a Comment