लवकरच भारत या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान आणि कतरिना कैफ आपल्या भेटीला येणार आहेत. ‘रेस-३’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. प्रेक्षकांचा चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सलमानच्या खास मित्राच्या भूमिकेत सुनिल ग्रोव्हर दिसणार आहे. ते दोघे खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र आहेत. त्याचबरोबर त्याला सलमान आणि कतरिना हे दोघेही आपला गुरू मानतात.
यामुळे ‘हा’ अभिनेता आहे सलमान आणि कतरिनाचा गुरू
सुनिल ग्रोव्हरच्या लोकप्रियतेत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तो ‘कपिल शर्मा शो’मधून ‘गुथ्थी’ आणि ‘डॉ. गुलाटी’ची भूमिका साकारत होता. त्याचे फॅन फॉलोओइंगही तेव्हापासूनच वाढले आहे. सलमान आणि कतरिनासोबत तो सध्या ‘भारत’ चित्रपटाचे प्रमोशन देखील करत आहे.
सलमान आणि कतरिनाने एका माध्यमाच्या मुलाखतीत सुनिल ग्रोव्हरचे भरभरुन कौतुक केले. त्याच्याबद्दल सलमानने सांगितले, की सुनिल फक्त एक प्रभावशाली कलाकारच नाही, तर तो उत्तम मिमिक्री आर्टिस्ट आहे. तो कोणत्याही भूमिकेत स्वत:ला झोकुन देतो. तो इतर कलाकारांचाही सन्मान करतो. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्यासोबत मला काम करायला मिळाले. तो खूप हुशार व्यक्ती आहे.
सुनिलचे कौतुक करताना कतरिनाही म्हणाली, की ‘शूटिंगच्या दरम्यान सुनिल आणि मी अनेक विषयांवर बोलायचो. सुनिलला प्रत्येक क्षेत्रातील माहिती आहे. तो असा व्यक्ती आहे, की ज्याच्यासोबत आपण कोणत्याही विषयावर तासनतास बोलू शकतो. त्याच्यासोबत वेळ घालवणे खूप मजेशीर होते. एकप्रकारे तो आमचा गुरूच आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर ‘भारत’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. सलमान खानच्या विविध रूपातील भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.