ज्याच्या स्पर्ममुळे झाली आई त्याच्याशी तब्बल १४ वर्षांनी करणार लग्न


चित्रपटातून किंवा रिअल लाइफमधून तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या आश्चर्यकारक अशा लव्हस्टोरी पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आम्ही तुम्हाला जी लव्ह स्टोरी सांगणार आहोत ती तुम्ही पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या लव्हस्टोरीपेक्षा फार वेगळी आहे. अमेरिकेत राहणाऱ्या जेसिकाची ही लव्हस्टोरी आहे. तशी ही लव्हस्टोरी काही महिने जुनीच आहे पण फारच रोचक अशी आहे. जवळपास १४ वर्षांपूर्वी म्हणजे २००५ मध्ये आई होण्यासाठी जेसिकाने एका स्पर्म डोनरची मदत घेतली होती. जेसिकाने ज्यामुळे एका मुलीला जन्म दिला आणि तिचे नाव एलिस ठेवले.

जेसिकाची मुलगी आता १४ वर्षांची झाली आहे. बऱ्याच गोष्टी तिला समजायल्या असल्यामुळे आईला तिने एकदा वडिलांबाबत काही प्रश्न विचारले. ती नंतर वडिलांना भेटण्याचा हट्ट करू लागली. मग काय जेसिकाने मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी ‘त्या’ स्पर्म डोनरचा शोध सुरू केला. जेसिकाने मोठ्या मेहनतीनंतर हॉस्पिटल आणि स्पर्म डोनर वेबसाइटच्या माध्यमातून डोनरला शोधले आहे.

याबाबत जेसिकाने सांगितले की, स्पर्म बॅंकमध्ये जाऊन मी त्यावेळी खेळ आणि वाचन असा क्षेत्रात आवड असणाऱ्या व्यक्तीच्या स्पर्मची मागणी केली होती. माझ्या गरजेनुसार बॅंकने स्पर्म उपलब्ध करून दिले आणि मी आई झाले. बॅंकेच्या नियमानुसार, डोनरचे नाव कधीही स्पर्म उघड केले जात नसल्यामुळे त्या व्यक्तीला मी कधीही भेटले नव्हते.

दरम्यान, आता जेसिकाने मुलीचा हट्ट पुरवण्यासाठी फार मेहनत घेतली. यासाठी डीएनए वेबसाइटची जेसिकाने मदत घेतली. जेसिकाने अनेक दिवसांच्या शोधानंतर एलिसच्या वडिलाचा शोध घेतला. आरोन असे त्याचे नाव आहे आणि तो अमेरिकेतील सीटेल शहरात राहणार आहे. स्पर्म डोनर म्हणूण अनेक मुला-मुलींचा आरोन वडील आहे.

जेसिकाने सांगितले की, आता अनेक प्रयत्नांनंतर कळाले आहे की, आरोन माझ्या मुलीचा वडील आहे आणि तो एक लेखक आहे. त्याच्या जीवनाचा २००५ दरम्यानचा काळ फारच अडचणींचा होता. त्याला तेव्हा फार आर्थिक अडचण होती. तर आरोनचे म्हणणे आहे की, आम्ही दोघे लवकरच डेटला जाणार आहोत, त्यानंतर आम्ही लग्न करू. मुलीच्या हट्टासाठी आरोन आणि जेसिकाने लग्नाचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment