कोकणतील क्रिकेटपटूंना क्रिकेटचे धडे शिकवणार विराट कोहलीचे प्रशिक्षक


सध्या क्रिकेटविश्वात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. नुकतेच आयसीसीचे ३ मानाचे पुरस्कार विराटने पटकावले. विराटच्या संघाला आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण आपली चमक मात्र विराटने दाखवून दिली. कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल किंवा खेळपट्टी गोलंदाजांना कितीही पोषक असेल, तरीही आपल्या संघासाठी पाय रोवून मैदानावर विराट उभा राहतो, हे क्रिकेटप्रेमींनी अनुभवले आहे. त्याचे प्रशिक्षक राज कुमार शर्मा यांचा तो उत्तम क्रिकेटपटू बनण्यामागे मोठा वाटा आहे. आता विराटचे हेच प्रशिक्षक कोकणातील क्रिकेटपटू घडवणार आहेत.


९ मे रोजी कणकवली येथे विराट कोहली याचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक राज कुमार शर्मा हे येणार आहेत. कणकवलीच्या तरुण आणि उमद्या दमाच्या क्रिकेटपटूंना व्हीके क्रिकेट अकॅडमी येथे क्रिकेटचे धडे देणार असल्याचे ट्विट आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

Leave a Comment