‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील ‘त्या’ दृश्याबद्दल काय म्हणते प्रिया बापट


अभिनेत्री प्रिया बापटचे नाव मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये आवर्जून घेतले जाते. प्रियाने मराठीसोबतच काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये झळकल्यानंतर आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रियाने पदार्पण केले आहे. तिची ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ ही पहिलीवहिली वेब सीरिज ‘हॉटस्टार’ या अॅपवरून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या या वेब सीरिजची जोरदार चर्चा आहे आणि त्याची चर्चा होण्यामागे कारणही तसेच आहे. प्रिया बापटचा या सीरिजमधील एक बोल्ड सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रियाचा बोल्ड सीन अभिनेत्री गीतिका त्यागीसोबत असून तिला याबद्दल ट्रोलही केले जात आहे. या दृश्याबद्दल बोलताना प्रिया म्हणाली, मी आजवर अशा प्रकारच्या ट्रोलिंगला प्रत्युत्तर दिले नाही. लोकांनी माझ्यावर कपड्यांवरूनही खूप टीका केली. हेच कपडे का घातले, एवढे छोटे कपडे का घातले, असे प्रश्न अनेकजण विचारतात. पण आपण यावर न बोलून आपले काम करत राहणे हे मला जास्त महत्त्वाचे वाटते. आजपर्यंत मी तेच केले आहे. माझे काम बोलू दे. वेब सीरिज प्रेक्षकांनी पाहिली जर त्या दृश्याचे महत्त्व का आहे हे समजेल.

प्रिया या सीरिजमध्ये पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. राजकारणाची पार्श्वभूमी नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजला आहे.

Leave a Comment