तुम्हाला तुमचे प्रेम मिळवून देईल फेसबुकचे ‘हे’ नवे फीचर


दर दुसऱ्या दिवशी कुठले ना कुठले नवे फीचर फेसबुक आपल्या युझर्ससाठी आणत असते. आपल्या युझर्सना नेहमी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न फेसबुक करतो. ‘फेसबुक डेटिंग’ या अॅप्लिकेशनमध्ये आता कंपनीने एक नवे फीचर आणले आहे. तुम्ही या फीचरच्या मदतीने तुमच्या फेसबुकवरील मित्रांना डेट करु शकता. तुम्हाला तुमचे प्रेम शोधण्यात आणि मिळवून देण्यात ‘सीक्रेट क्रश’ नावाचे हे नवे फीचर मदत करेल. तुम्ही यामध्ये कुठल्याही नऊ अशा मित्रांना जोडू शकता ज्यांना तुम्ही डेट करु इच्छिता.

या फीचरबाबतची माहिती फेसबुकने कॅलिफोर्नियाच्या सान जोस येथे मंगळवारी झालेल्या वार्षिक ‘एफ 8’ संमेलनात देण्यात आली. तुम्ही जर तुमच्या क्रशला ‘फेसबुक डेटिंग’साठी निवडले असेल, तर एक नोटीफिकेशन त्यांना जाईल की, त्यांना कुणी पसंत केले आहे. त्यानंतर त्याने जर त्याच्या ‘सीक्रेट क्रश’मध्ये तुम्हाला निवडले, तर हे ‘मॅच’ म्हणजेच एक जोडी बनेल, असे या संमेलनात सांगण्यात आले.

तुमचा क्रश जर ‘डेटिंग’वर नसेल, तर ‘सीक्रेट क्रश’ यादी बनवू नका. तसेच, त्यांच्या यादीतही जोडले जाऊ नका, जेणेकरुन कुणालाही तुम्ही कुठल्या मित्राचे नाव जोडले आहे, हे कळणार नाही, असेही फेसबुकने सांगितले. तुम्ही फेसबुकवर फेसबुक इवेंट्स, ग्रुप्स, फ्रेंड्स ऑफ फ्रेंड आणि इतर कुठल्याही कम्यूनिटी इत्यादी पर्यायांद्वारे तुम्ही स्वत:साठी ‘मॅच’ शोधू शकता.

कोलंबिया, थायलंड, कॅनडा, अर्जेन्टीना आणि मेक्सिको येथील फेसबुक युझर्ससाठी हे फीचर उपलब्ध करण्यात आले होते. पण हे फीचर आता फिलिपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, लाओस, ब्राझील, पेरु, चिली, बोलिव्हिआ, इक्वाडोर, उरुग्वे, पराग्वे, गयाना आणि सुरीनाम इत्यादी देशांमध्ये पोहोचले आहे. तसेच, युझर्सची शाळा, कार्यालय किंवा शहरातील सारख्या कम्युनिटीमधील नवीन लोकांशी ओळख व्हावी, मैत्री व्हावी यासाठी कंपनीने ‘मीट न्यू फ्रेंड्स’ हे फीचर आणले आहे, असेही फेसबुकने सांगितले.

Leave a Comment